कान्सू

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कान्सू

कान्सू (देवनागरी लेखनभेद: गान्सू ; सोपी चिनी लिपी: 甘肃; पारंपरिक चिनी लिपी: 甘肅; फीन्यिन: Gānsù;) हा चीन देशाच्या ईशान्येकडील प्रांत आहे. हा प्रांत तिबेटाचे पठार व ह्वांगथू पठार यांच्या मधोमध वसला आहे. याच्या उत्तरेस मंगोलियाची आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच आंतरिक मंगोलिया व निंग्श्या, पश्चिमेस शिंच्यांग व छिंघाय, दक्षिणेस सिच्वान, पूर्वेस षा'न्शी या चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील प्रांतांच्या सीमा भिडल्या आहेत. कान्सूच्या दक्षिणेकडील भागातून पीत नदी वाहते. लांचौ येथे या प्रांताची राजधानी आहे.

सुमारे २.६ कोटी लोकसंख्या (इ.स. २००९) असलेल्या कान्सूत ह्वी वांशिकांचे लक्षणीय अस्तित्त्व आहे. प्रांताच्या नैऋत्येकडील भागांत तिबेटी लोकही वसले आहेत. एकूण लोकसंख्येपैकी ९१ % प्रजा हान वंशीय असून, ५ % प्रजा ह्वी वंशीय, तर २ % प्रजा तिबेटी वंशीय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →