कातानिया (इटालियन: Catania, उच्चार ) हे इटली देशाच्या सिचिल्या प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिचिल्याच्या पूर्व भागात आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. कातानिया हे सिसिलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे (पालेर्मोखालोखाल) तर इटलीमधील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शहराची लोकसंख्या ३,११,५८४ तर महानगराची लोकसंख्या ११,०७,७०२ इतकी आहे.
इ.स. पूर्व आठव्या शतकात वसवलेले व मोठा इतिहास असणारे कातानिया रानिसां काळात इटलीमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय शहर होते. सध्या कातानिया सिसिलीमधील एक मोठे औद्योगिक व पर्यटन केंद्र आहे.
हे शहर अनेकदा नैसर्गिक आपत्त्यांमध्ये उद्ध्वस्त झाले होते. ११६९मधील भूकंप, १६६९मधील माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यातून शहरावर आलेली लाव्हाची लाट आणि पुन्हा १६९३चा भूकंप ही काही उदाहरणे आहेत.
कातानिया
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.