कातेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. गावाच्या मध्य भागात ग्राम पंचायत कार्यालय व तसेच कै. सौदगर आप्पा क्षीरसागर सार्वजनिक वाचनालय आहे. गावात सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आनंदाने राहतात. गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात मराठा(क्षिरसागर), धनगर(मासाळ) व महार (ओहळ) ही एकमेकांची भावकी मानली जाते, संपूर्ण भारतामध्ये असे एकमेव उदाहरण आहे जे की तीन वेगवेगळ्या जातीचे लोक एकमेकांची भावकी आहे.भावकीमुळे सर्वजण गुण्या गोविंदाने राहतात. गावात सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.
गावात रोजगार हा शेतीवर आधारित असून शिकलेला तरुण रोजगारासाठी, नोकरीसाठी पुणे व मुंबई कडे जातो. वर्षाकाठी दिवाळी, सण व महातम्यांच्या जयंती उत्सवासाठी एकत्रित येतात.
गावात जिल्हा परिषद शाळा इयत्ता 7वी पर्यंत असून शाळेची इमारत ही अत्यंत देखणी आहे.शाळेभोवती अत्यंत सुंदर बगीचा आहे. गावात मारुती मंदिर, अंबाबाई मंदिर, मळसिद्धआप्पा मंदिर व अनेक मंदिरे आहेत.
गावचे दळणवळण म्हणजे जवळपासचे गवे ही कुरुल व तालुक्याचे ठिकाण मोहोळ आहे.
काटेवाडी (मोहोळ)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.