काजोल

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

काजोल

काजोल देवगण (पूर्वीचे नाव: काजोल मुखर्जी, ५ ऑगस्ट १९७४) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर ६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत (नूतनसोबत बरोबरी) ज्यांपैकी विक्रमी ५ पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत. २०११ साली भारत सरकारने काजोलला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

१९९२ सालच्या बेखुदी ह्या चित्रपटामधून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९३ साली शाहरूख खानसोबतचा बाजीगर हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्यानंतर १९९५ साली आदित्य चोप्राने आपल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये काजोलला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या तुफान यशामुळे काजोल यशाच्या व कीर्तीच्या शिखरावर पोचली. ह्यानंतरच्या काळात करण जोहरने काजोल व शाहरूख खान जोडीसोबत अनेक यशस्वी चित्रपट काढले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →