करण जोहर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

करण जोहर

करण जोहर ( २५ मे १९७२) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी काही दिग्दर्शित केल्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

करणने आदित्य चोप्राच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका करून आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरुवात केली. १९९८ साली त्याने कुछ कुछ होता है ह्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर करणने शाहरूख खानसह अनेक चित्रपट काढले जे सर्व सुपरहिट झाले. करण जोहर, शाहरूख खान व काजोल ह्यांचे त्रिकूट बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस मानले जाते.

चित्रपतसृष्टीसोबतच करणने दूरचित्रवाणीवर देखील आपला ठसा उमटवला. त्याचा कॉफी विथ करण हा मुलाखत कार्यक्रम लोकप्रिय होता. तसेच झलक दिखला जा ह्या लोकप्रिय नाच-प्रदर्शन कार्यक्रमामध्ये तो माधुरी दीक्षित व रेमो डिसुझा ह्यांच्यासोबत तो परिक्षक होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →