कांचनगंगा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. हिमालयमधील कांचनगंगा शिखरावरून नाव ठेवण्यात आलेली ही गाडी ईशान्य भारताच्या आसाम व त्रिपुरा राज्यांना पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरासोबत जोडते. सुरुवातीला हावडा रेल्वे स्थानक ते न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी ही गाडी गुवाहाटीपर्यंत वाढवण्यात आली. फेब्रुवारी २०१६ मध्ये ह्या गाडीचा मार्ग सियालदाह रेल्वे स्थानक ते सिलचर असा तर ऑक्टोबर २०१६ मध्ये आगरताळ्यापर्यंत वाढवला गेला. ही गाडी भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व सीमा रेल्वेद्वारे चालवली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कांचनजंगा एक्सप्रेस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.