कविता मुरुमकर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कविता मुरुमकर (१७ मार्च, इ.स. १९७७) या मराठीतील कवयित्री, कादंबरीकार, अनुवादक आणि साहित्यसमीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कविता, कादंबरी, साहित्यसमीक्षा आणि अनुवाद या विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. मी सावित्री ज्योतिराव ही त्यांची चरित्रात्मक कादंबरी, भैरवी ही कादंबरी तसेच मीराधा, तुझीच कविता आणि उसवायचाय तुझा पाषाण हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी सुमती लांडे : समग्र कविता या ग्रंथाचे संपादन केले असून निसटून गेलेल्या दिवसांच्या वाटेवर या ग्रंथाचा अनुवाद केला आहे. साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात कवितेचा आत्मस्वर आणि कवितेचा अंतरंग या ग्रंथांसह विविध साहित्यकृतींवर त्यांनी समीक्षात्मक लेखन केले आहे. त्यांच्या मी सावित्री ज्योतिराव या कादंबरीचा तसेच उसवायचाय तुझा पाषाण या काव्यसंग्रहाचा विद्यापीठीय अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या संदर्भात वापर झालेला आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, पु. भा. भावे राज्यस्तरीय पुरस्कार, कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार आणि डॉ. दा. ता. भोसले जिव्हाळा साहित्य पुरस्कार यांसह विविध साहित्यिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →