कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ - १४२ (Kalyan East Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कल्याण पूर्व मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १३ ते ३०, २. अंबरनाथ तालुक्यातील कुंभार्ली महसूल मंडळ, ३. उल्हासनगर तालुक्यातील उल्हासनगर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.२३ ते २६, ४३ आणि ५२ ते ५५ यांचा समावेश होतो. कल्याण पूर्व हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय जनता पक्षाचे गणपत काळू गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?