कल्पना कार्तिक (जन्म मोना सिंग ; १९ ऑगस्ट, १९३१) ह्या एक निवृत्त हिंदी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी १९५० च्या दशकात सहा चित्रपटांमध्ये काम केले. दिवंगत हिंदी चित्रपट अभिनेते आणि निर्माते देव आनंद यांच्या त्या पत्नी आहेत.
सिमला येथील सेंट बेडे कॉलेजमध्ये शिकत असताना सिंग ह्या ब्युटी क्वीन होत्या. नवकेतन फिल्म्सचे चेतन आनंद यांच्या १९५१ मध्ये बाजी या चित्रपटात त्यानी प्रथम काम केले. यात देव आनंद हे देखिल होते. नंतर त्यांनी देव आनंद सोबत नंतरच्या सर्व चित्रपटांमध्ये काम केले. त्याचे नाव कल्पना कार्तिक हे चेतन आनंदने ठेवले होते. अंधियां (१९५२), हमसफर (१९५३), टॅक्सी ड्रायव्हर (१९५४), हाउस नंबर 44 (१९५४) आणि नौ दो ग्यारह (१९५७) हे तिचे इतर चित्रपट होते.
कल्पना कार्तिक
थोडक्यात पण महत्त्वाचे.