भारतीय दंड संहितेच्या कलम २९५अ मध्ये कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा अपमान करून त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून आणि द्वेषपूर्ण कृत्यांसाठी शिक्षा निश्चित केली आहे. हा भारतातील द्वेषयुक्त भाषण विरोधी कायद्यांपैकी एक आहे. या कायद्यानुसार भारतातील सर्व धर्मांविरुद्ध ईशनिंदा करण्यास मनाई आहे.
कलम २९५अ हा दखलपात्र, अ-जामीनपात्र आणि अ-समर्थनीय गुन्हा आहे. नव्या भारतीय न्याय संहितेमध्ये हा गुन्हा कलम २९९ खाली लिहीला आहे.
कलम २९५अ (भारतीय दंड संहिता)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.