फेब्रुवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात कर्नाटक राज्यात हिजाब वाद भडकला. हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हा वाद सुरू झाला. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी कर्नाटक सरकारने महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. कर्नाटकातील काही महाविद्यालयांमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास मनाई केल्यानंतर उच्च न्यायालयात दोन याचिकाही दाखल करण्यात आल्या.
८ फेब्रुवारी २०२२ रोजी कर्नाटक राज्यात मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केल्याबद्दलचा वाद अधिक तीव्र झाला, त्यानंतर राज्य सरकारने पुढील तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली.
कर्नाटक हिजाब वाद, २०२२
या विषयावर तज्ञ बना.