करण कुंद्रा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

करण कुंद्रा

करण कुंद्रा (जन्म: ११ ऑक्टोबर १९८४) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी भाषेतील दूरदर्शन आणि चित्रपटांमध्ये काम करतो. भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्यांपैकी हा एक आहे. त्याने एकता कपूरच्या लोकप्रिय टेलिव्हिजन शो कितनी मोहब्बत है (२००९) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

कुंद्रा ने कितानी मोहब्बत है २, ये कहां आ गये हम, दिल ही तो है, ये रिश्ता क्या कहलाता है आणि तेरे इश्क में घायल यांसारख्या अनेक दूरदर्शन मालिकांमध्ये भूमिका केल्या आहे. त्यांनी एमटीव्ही रोडीज, एमटीव्ही लव्ह स्कूल, डान्स दीवाने ज्युनियर्स आणि टेम्पटेशन आयलंड इंडिया सारखे रिॲलिटी कार्यक्रमांचे देखील सुत्रसंचालन केले आहे. मुबारकां, १९२१ आणि तेरा क्या होगा लवली या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. २०२१ मध्ये, त्याने बिग बॉस १५ मध्ये भाग घेतला आणि दुसरा उपविजेता झाला.

करण कुंद्रा २०२१ पासून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सोबत प्रेमसंबंधात आहे. लेडीज व्हर्सेस जेंटलमेनमध्ये काम करत असताना दोघांची भेट झाली आणि बिग बॉस १५ च्या घरात त्यांनी डेटिंग सुरू केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →