कबीर पंथ भारताच्या भक्तीकाळातील कवी संत कबीर यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे. कबीर पंथ हा संत कबीर यांनी सुरू केलेला भक्तीचा मार्ग आहे. कबीर पंथ कबीर यांना त्यांच्या मुख्य गुरू किंवा खऱ्या परमेश्वराचे अवतार मानतो. कबीरांचे शिष्य धर्मदास ह्यांचे पुत्र चुडामणी ह्यांच्यापासून प्रथम कबीर पंथाची सुरुवात झाली. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षणांवर आधारित हा पंथ कालांतराने धार्मिक संप्रदायात बदलला. कबीर पंथाच्या अनुयायांमध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध आणि जैन अशा सर्व धर्मांचे लोक समाविष्ट आहेत. कबीरांच्या रचनांचा संग्रह बीजक या ग्रंथाच्या वैचारिक आणि आध्यात्मिक विचारांचा आधार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कबीर पंथ
यामागील विज्ञान आणि इतिहास.