संत गरीब दास (१७१७-१७७८) हे भक्ती आणि काव्यासाठी ओळखले जातात. गरीब दास यांनी सद्ग्रंथ साहिब या नावाने प्रसिद्ध असलेला एक मोठा संग्रह रचला.गरीबदास साहेबांनी सद्गुरू कबीर साहेबांच्या अमृतवाणीचे वर्णन केले ज्याला रत्नसागर असेही म्हणतात. एच.ए. रोजच्या म्हणण्यानुसार, गरीबदासच्या ग्रंथसाहिब पुस्तकात कबीरांचे ७००० श्लोक घेतले आहेत आणि १७००० श्लोक स्वतः गरीबदास यांनी रचले आहेत. गरीबदासचे तत्वज्ञान असे होते की राम आणि रहिममध्ये फरक नाही. गरीबदास यांचे समाधी स्थळ आजही हरियाणा येथील छुडानी आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर या गावी सुरक्षित आहे. वयाच्या १० व्या वर्षी कबीर स्वतः आले आणि संत गरीब दास जी यांना भेटले आणि त्यांना आपले ज्ञान सांगितले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गरीब दास
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!