कन्हैया कुमार हा जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आहे. तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष ह्याच्या अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचा एक नेता आहे.
फेब्रुवारी २०१६ रोजी, भारताच्या विरुद्ध नारेबाजी केल्याच्या आरोपात त्याच्यवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली. ते नारे एका मिरवणुकीत काढण्यात आले होते जी कि अफझल गुरूह्याच्या गळफाच्या विरुद्ध होती. २ मार्च २०१६ रोजी पुराव्याचा अभाव असल्यामुळे त्याची जमानत करण्यात आली. कन्हैयाने त्याच्या विरुद्धचे आरोप खोटे असल्याचा दावा केला व सुटका झाल्यावर भारताच्या स्वातंत्र्यावर भाषण दिले. त्यासोबतच विद्यापीठाच्या कुलगुरूंने त्या कार्यक्रमाची तपासणी करण्यासाठी एक समिती बनविली व बोलले कि कार्यक्रमाचे आयोजकांनी परवानगी पद्धतीने घेतली नवहती. विद्यापीठाने आयोजनात असलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली व कन्हैया वर १०००० रुपयांचा दंड लावला.
कन्हैया कुमार
थोडक्यात पण महत्त्वाचे.