बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन (संक्षिप्त: बीएपीएसए ही भारतातील एक विद्यार्थी संघटना आहे. हिची स्थापना बिरसा मुंडा याच्या जन्म वर्धापनदिनाला १५ नोव्हेंबर २०१४ रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे झाली होती. ही संघटना विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि इतर अल्पसंख्याक गटांना प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांसाठी कार्य करते. बीएपीएसए ठामपणे सांगतात की ते आंबेडकरवादी विचारसरणीचे अनुसरण करतात. आणि ते कॅम्पसमधील उजव्या आणि डाव्या पक्षांच्या दोन्ही बाजूंनी टीका करतात. या संघटनेचे नाव बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने ठेवले गेले आहे. बीएपीएसए गुजरातच्या मध्यवर्ती विद्यापीठातही कार्यरत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?