कन्नड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. कन्नड (औरंगाबाद) या गावी या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
कन्नड शहर हे ३-दरवाज्याचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते. कन्नड शहरात माळीवाडा येथे वेश (दरवाजा) असून २) दरवाजा काली मस्जिद समोर होता व तिसऱ्या दरवाजाचे अस्तित्त्व उपलब्ध नाही. कन्नड शहराची लोकसंख्या-३४४०३.
कन्नड शहराला आज कन्नड नावाने जाते, मात्र जुने लोक या शहराचे नाव कनकावती होते असे सांगतात.
छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा येथे जात असताना कन्नड तालुक्यातील शिवराई ह्या गावात महाराजांचा मुक्काम झाला होता, असाही इतिहास आहे. १८८४च्या इंग्रज राजवटीतील गॅजेटमध्ये कन्नड शहराचा उल्लेख ब्राम्हणी नदी व शिवना नदीच्या संगमावर वसलेले शहर अशी नोंद आहे. त्यामध्ये कन्नड शहराचे नाव कन्हेर असे नमुद आहे.
या ठिकाणी १८९८ पर्यंत इंग्रज वसाहत लष्कर परिसरात आस्तित्वास असल्याचे दिसते. त्या दरम्यानचे ख्रिश्चन स्मशानभुमी समर्थनगर परिसरात आज ही आस्तित्वात आहे.
कन्नड तालुका
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.