कटला मासा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कटला गोड्या पाण्यात राहणारा असून भारतात सगळीकडे आढळतो. कृष्णा नदीच्या दक्षिणेस हा पूर्वी दुर्मिळ असे पण हल्ली मत्स्य-संवर्धनामुळे दक्षिणेत याचा प्रसार फार झपाट्याने होत आहे.

सायप्रिनिडी कुलातील कटला वंशाचा हा मासा आहे.कार्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माशांच्या समूहातील तो आहे. याचे शास्त्रीय नाव कटला कटला असे आहे. कटला हे भारतीय नाव इंग्रजी भाषेतही रूढ झालेले आहे. महाराष्ट्रात या माशाला तांबरा म्हणतात पण काही ठिकाणी कटला हे नावही प्रचारात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →