कॉड

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कॉड

गॅडिफॉर्मिस गणाच्या गॅडिडी कुलातील निरनिराळ्या जातींच्या माशांना एकत्रितपणे कॉड म्हणतात. हे सागरी मासे आहेत. उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर पॅसिफिक महासागर आणि बाल्टिक समुद्र यात ते आढळतात. अटलांटिक महासागरात आढणाऱ्या कॉडचे शास्त्रीय नाव गॅडस मोऱ्हुआ आहे. त्याची लांबी ७ सेंमी.पासून १८५ सेंमी पर्यंत असते. वजन ३-१८ किग्रॅ. असून यापेक्षाही जास्त वजनाचे कॉड असल्याची नोंद आहे. कॉडचे डोके मोठे असून बाकीचे शरीर शेपटीकडे निमुळते होत गेलेले असते. तोंड व डोळे मोठे असतात. वरचा जबडा खालच्या जबड्यापेक्षा थोडा पुढे आलेला असतो. पृष्ठपक्ष तीन व गुदपक्ष दोन असतात. शरीरावरील खवले लहान असतात. शरीराचा रंग हिरवा, तपकिरी किंवा तांबडा असतो. मादी एका वर्षात सरासरी ९० लाख अंडी घालते. अंडी लहान व पाण्यावर तरंगणारी असतात. १० ते १५ दिवसांत अंड्यांतून पिले बाहेर पडून पोहू लागतात. अपृष्ठवंशीय प्राणी व लहान मासे हे कॉ़डचे भक्ष्य आहे. भारतात आढळणाऱ्या कॉडचे शास्त्रीय नाव ब्रेग्मॅसेरॉस मॅक्कलेलॅंडाय असे आहे. त्याची लांबी ७-८ सेंमी. असून वजन सु. ३ किग्रॅ. असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →