औसा (Ausa) हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे औसा तालुक्याचे मुख्यालयही आहे. औसा नगर परिषद ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. नागरी संस्थेचे कार्यक्षेत्र ५.४ किमी२ (२.१ चौरस मैल) मध्ये पसरलेले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३६,११८ एवढी होती.
औसा शहराला ऐतेहासिक, सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. औसा या शहराचे हिजरी १०१४ मध्ये मलीक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. हे शहर साधाराणपणे साडेसहाशे वेर्षापुर्वी वसलेले आहे. औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरीशत असे आहे. उच्छीव त्वरीशत हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो. जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने "औच्छ" असा उल्लेख केलेला आहे. सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनकांबर हा औशाचा रहिवासी होता. त्याने "करंडक चरयू" हा काव्यग्रंथ लिहिला आहे.या कव्याग्रंथात त्याने औसा या नगराची "असई"असा उल्लेख केला आहे. प्राचीन काळापासून उच्छीव, औच्छ, असई, औसा अशी नवे रूढ झाली असावीत. यादव कालीन खोलेश्वर दरवाजा, अंबाजोगाई शिलालेख (शके १४५०) यात उदगीर बरोबर औश्याचीही नोंद आहे. यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते.
औसा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?