ओसिॲनस (ग्रीक: Ὠκεανός ओकिआनॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गैय्या (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. त्याने त्याची बहिण टेथिस हिच्याशी विवाह केला. टेथिस आणि ओसिॲनसने 'नदी देव' समजल्या जाणाऱ्या अनेक देवांचा आणि तीन हजार समुद्री अप्सरांना जन्म दिला.
ग्रीक लोक ओसिॲनसला समुद्राचे मूर्त स्वरूप मानत. तसेच जगाच्या भोवती लपेटलेली महाकाय नदी हे त्याचे रूप आहे, असे समजत असत.
ओसिॲनस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.