ओरेगन

या विषयावर तज्ञ बना.

ओरेगन

ओरेगन (इंग्लिश: Oregon, { उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य (पॅसिफिक नॉर्थवेस्ट) भागात वसलेले ओरेगन क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील नववे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २७व्या क्रमांकाचे राज्य आहे.

ओरेगनच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्वेला आयडाहो, दक्षिणेला कॅलिफोर्निया व नेव्हाडा तर उत्तरेला वॉशिंग्टन ही राज्ये आहेत. सेलम ही ओरेगनची राजधानी तर पोर्टलंड हे सर्वात मोठे शहर आहे.

बर्फाच्छादित पर्वतरांगा, लांबलचक समुद्र किनारा, अनेक नद्या व सरोवरे ह्यांमुळे ओरेगनला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. ह्या राज्याचा जवळपास अर्धा भाग जंगलाने व्यापला आहे. ओरेगन हे अमेरिकेमधील सर्वात हरित राज्य मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →