वॉशिंग्टन (इंग्लिश: Washington, उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य (पॅसिफिक नॉर्थवेस्ट) भागात वसलेले वॉशिंग्टन क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तेराव्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्याला हे नाव जॉर्ज वॉशिंग्टन ह्या अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षावरून देण्यात आले.
वॉशिंग्टनच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, उत्तरेला कॅनडाचा ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पूर्वेला आयडाहो, दक्षिणेला ओरेगन ही राज्ये आहेत. ऑलिंपिया ही ओरेगनची राजधानी तर सिअॅटल हे सर्वात मोठे शहर आहे. राज्यातील ६० टक्के रहिवासी सिअॅटल महानगर परिसरात वास्तव्य करतात.
औद्योगिक दृष्ट्या वॉशिंग्टन हे एक पुढारलेले राज्य आहे. उत्पादन, सॉफ्टवेर सेवा व कृषी हे येथील प्रमुख उद्योग आहेत. मायक्रोसॉफ्ट, बोईंग, स्टारबक्स, अॅमेझॉन.कॉम, झेरॉक्स इत्यादी अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये सिअॅटल महानगर क्षेत्रात स्थित आहेत. वॉशिंग्टनमधील सफरचंदांचे उत्पादन अमेरिकेत सर्वाधिक आहे.
वॉशिंग्टन राज्याला २०११ मध्ये अमेरिकेमधील सर्वात स्वच्छ राज्य हा पुरस्कार मिळाला.
वॉशिंग्टन (राज्य)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.