ओक्लाहोमा सिटी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ओक्लाहोमा सिटी

ओक्लाहोमा सिटी (इंग्लिश: Oklahoma City) ही अमेरिका देशातील ओक्लाहोमा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सुमारे ५.८ लाख शहरी लोकसंख्या व १२.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले ओक्लाहोमा सिटी ह्या दृष्टीने सध्या अमेरिकेतील ३१व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ओक्लाहोमाच्या मध्य भागात वसले असून ते अमेरिकेच्या चक्रीवादळप्रवण क्षेत्रात स्थित आहे. आजवरच्या इतिहासात ओक्लाहोमा सिटीला ९ मोठ्या चक्रीवादळांचा तडाखा बसला असून १९९९ साली झालेल्या चक्रीवादळामुळे येथे १.१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते.

एप्रिल १९, इ.स. १९९५ रोजी घडवून आणलेल्या ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोटात १६८ लोक मृत्यूमुखी पडले. नाईन-इलेव्हन विमान हल्ल्यांअगोदर ओक्लाहोमा सिटी बॉंबस्फोट ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी दहशतवादी घटना होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →