ऑस्ट्रिया राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२५ मध्ये चार आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी रोमेनियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांचा सामना रोमेनिया राष्ट्रीय क्रिकेट संघाशी झाला. सर्व सामने इल्फोव्ह काउंटी येथील मोआरा व्लासी क्रिकेट मैदान येथे खेळवण्यात आले.
ऑस्ट्रियाने पहिला सामना ४ गडी राखून जिंकला, तर रोमेनियाने दुसरा सामना ३ गडी राखून जिंकून मालिका १–१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर ऑस्ट्रियाने तिसरा सामना ७ गडी राखून आणि चौथा सामना ४२ धावांनी जिंकून चार सामन्यांची मालिका ३–१ ने जिंकली.
ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा रोमानिया दौरा, २०२५-२६
या विषयातील रहस्ये उलगडा.