ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२१

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२१

ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान बेल्जियमचा दौरा केला. नियोजनानुसार ऑस्ट्रिया संघ मे २०२१ मध्ये बेल्जियमच्या दौऱ्यावर जाणार होता. बेल्जियममध्ये कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता. सरतेशेवटी जुलै २०२१ मध्ये सामने खेळवण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व सामने वॉटर्लू मधील रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान येथे खेळविण्यात आले. हा ऑस्ट्रियाचा पहिला वहिला द्विपक्षीय मालिका दौरा होता तसेच ऑस्ट्रियाचा हा बेल्जियमचा पहिला दौरा होता.

बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकत मायदेशात पहिला वहिला मालिका विजय संपादन केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →