ऑत-साव्वा (फ्रेंच: Haute-Savoie; इंग्लिश लेखनभेदः अप्पर सॅव्हॉय) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग आल्प्स पर्वतरांगेत इटली व स्वित्झर्लंड देशांच्या सीमेजवळ वसला आहे. ह्याच्या उत्तरेला जिनिव्हा सरोवर व स्वित्झर्लंडचे जिनिव्हा राज्य, पूर्वेला स्वित्झर्लंडचे व्हाले व इटलीचा व्हाले दाओस्ता हा प्रदेश तर इतर दिशांना फ्रान्सचे इतर विभाग आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑत-साव्वा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.