१२९५३/१२९५४ ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस ही भारतामधील पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक जलदगती प्रवासी रेल्वे आहे. ही राजधानी एक्सप्रेस नवी दिल्ली व मुंबई ह्या भारतामधील दोन सर्वात मोठ्या शहरांना जोडते. १९४२ सालच्या चले जाव आंदोलनाची सुरुवात झालेल्या मुंबईमधील ऑगस्ट क्रांती मैदानावरून ह्या रेल्वेचे नाव दिले गेले आहे. मुंबई-दिल्ली दरम्यान रोज धावणाऱ्या दोनपैकी ही एक राजधानी एक्सप्रेस आहे (मुंबई राजधानी ही दुसरी).
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.