ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० ही टेनिस खेळामधील असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सचा भाग असलेल्या ९ पुरुष एकेरी व दुहेरी स्पर्धांची एक वार्षिक शृंखला आहे. ४ ग्रँड स्लॅम व ए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धांखालोखाल ह्या मास्टर्स स्पर्धा महत्त्वाच्या व मानाच्या समजल्या जातात. टेनिस श्रेणीमध्ये उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व पुरुष टेनिस खेळाडूंना ह्या स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे.
२५ अजिंक्यपदे जिंकणारा रफायेल नदाल सध्या ह्या स्पर्धांमध्ये आघाडीचा एकेरी तर २५ वेळा जिंकणारा डॅनियेल नेस्टर हा दुहेरी टेनिस खेळाडू आहेत.
ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १०००
या विषयावर तज्ञ बना.