अल्लाह रक्खा रहमान (तामिळ: ஏ. ஆர். ரகுமான், जन्म नाव: ए.एस. दिलीपकुमार, திலீப் குமார்) हे एक जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार आहेत. आपल्या काळामधील सर्वश्रेष्ठ संगीतकार मानल्या जात असलेल्या रहमानने आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलियोनेर ह्या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमान यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
रहमान यांना आजवर दोन ऑस्कर पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ फिल्मफेअर पुरस्कार व १३ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाले आहेत. आजवरच्या त्यांच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना भारतीय संगीताला नवी ओळख दिल्याचे श्रेय दिले जाते.
ए.आर. रहमान
या विषयावर तज्ञ बना.