रोजा हा १९९२ चा भारतीय तमिळ भाषेचा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. याची कथा आणि दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. यात अरविंद स्वामी आणि मधु मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा तामिळनाडूतील एका खेड्यातील एका सामान्य मुलीवर आधारित आहे, जी तिच्या पतीला जम्मू आणि काश्मीरमधील अतिरेक्यांनी अपहरण केल्यानंतर त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करते.
या चित्रपटाची निर्मिती के. बालचंदर यांनी त्यांच्या कवितालय प्रॉडक्शन अंतर्गत केली आणि जी. व्यंकटेश्वरन यांनी वितरण केले होते. चित्रपटाचे छायाचित्रण संतोष सिवन यांनी केले असून संकलन सुरेश उर्स यांनी केले आहे. १५ ऑगस्ट १९९२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्याच्या देशभक्तीपर संकल्पनेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला.
या चित्रपटाने राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. १८ व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकनासह या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय ख्यातीही मिळवली. जगभरातील दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या भीतीच्या वातावरणावर आधारित आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.
ए.आर. रहमानने या चित्रपटाद्वारे स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण केले. त्याला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - तमिळसाठी फिल्मफेर पुरस्कार आणि त्याच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा 'तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार' मिळाला.
रोजा (चित्रपट)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?