एस. जानकी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एस. जानकी

सिस्तला जानकी (एप्रिल २३, १९३८ - जुलै ११, २०२६) या लोकप्रिय भारतीय पार्श्वगायिका, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका आणि संगीत दिग्दर्शक होत्या. त्यांना 'जानकी अम्मा' आणि "दक्षिण भारताची गानकोकिळा" असे संबोधले जात असे.

त्यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी, ११ जुलै २०२६ रोजी म्हैसूर, कर्नाटक येथे वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारामुळे निधन झाले.

जानकी यांनी चित्रपट, अल्बम, दूरदर्शन आणि रेडिओसाठी ४८,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत, ज्यामध्ये कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, हिंदी, संस्कृत, ओडिया, तुलु, उर्दू, पंजाबी, बडागा, बंगाली, कोकणी अशा २० भारतीय भाषांमधील सोलो, युगल गीते, कोरस आणि शीर्षक गीतांचा समावेश आहे; तसेच इंग्रजी, जपानी, जर्मन आणि सिंहली यांसारख्या परदेशी भाषांमधील गाण्यांचाही समावेश आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सर्वाधिक गाणी कन्नड आणि मल्याळम भाषेचा भाषेत गायली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →