के.के. (गायक)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

के.के. (गायक)

कृष्णकुमार कुन्नथ (मल्याळम: കൃഷ്ണകുമാര് കുന്നത്ത്,) (२३ ऑगस्ट १९६८ – ३१ मे २०२२), हा एक लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होता. तो केके या नावाने प्रसिद्ध होता. भारतीय संगीत उद्योगातील सर्वोत्कृष्ट आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाणाऱ्या केके याने हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, बंगाली, आसामी आणि गुजरातीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली.

के.के. ने आपल्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरात जिंगल्ससाठी गाऊन केली. ए.आर. रहमानसाठी गाऊन त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९९९ मध्ये त्याने पल नावाचा त्याचा पहिला अल्बम लाँच केला. पाल अल्बम मधील "पल" आणि "यारों" ही गाणी खूप लोकप्रिय झाली आणि ही गाणी बऱ्याच वेळा शाळेच्या निरोप समारंभात वापरली जातात.

हम दिल दे चुके सनम (१९९९) मधील "तडप तडप", तामिळ गाणे "आपडी पोडू", देवदास (२००२) मधील "डोला रे डोला", वो लम्हे...(२००६) मधील "क्या मुझे प्यार है", ओम शांती ओम (२००७) मधील "आँखों में तेरी", बचना ए हसीनो (२००८) मधील "खुदा जाने", आशिकी २ (२०१३) मधील "पिया आये ना", मर्डर ३ (२०१३) मधील "मत आजमा रे", हॅपी न्यू इयर (२०१४) मधील "इंडिया वाले" आणि बजरंगी भाईजान (२०१५) मधील "तू जो मिला", ही त्याची गाणी अतिशय लोकप्रिय आहेत. के.के.ला सहा फिल्मफेअर पुरस्कार नामांकने आणि एक फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →