एशियन पेंट्स लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय पेंट (रंगाची) कंपनी आहे. त्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे . ही कंपनी पेंट्स, कोटिंग्ज, घराच्या सजावटीशी संबंधित उत्पादने बनवते. तसेच बाथ फिटिंग्ज आणि संबंधित सेवा पुरवण्याच्या व्यवसायात आहे. एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी आणि आशियातील तिसरी सर्वात मोठी पेंट कॉर्पोरेशन आहे. २०१५ मध्ये भारतीय पेंट उद्योगात या कंपनीचा सर्वाधिक म्हणजे ५४.१% हिस्सा होता. एशियन पेंट्स ही बर्गर इंटरनॅशनलची होल्डिंग कंपनी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एशियन पेंट्स
यामागील विज्ञान आणि इतिहास.