एलेन बर्स्टिन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

एलेन बर्स्टिन

एलेन बर्स्टिन (जन्म एडना राय गिलूली; ७ डिसेंबर १९३२) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. ही नाटकांमधील गुंतागुंतीच्या महिलांच्या चित्रणासाठी ओळखली जाते. तिला अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार आणि दोन प्राइमटाइम एमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ह्यामुळे ती अभिनयाचा तिहेरी मुकुट प्राप्त करणाऱ्या काही कलाकारांपैकी एक बनली आहे. तिला बाफ्टा पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील मिळाले आहे.

बर्स्टिनने १९५७ मध्ये ब्रॉडवेवर फेअर गेम मधून अभिनयात पदार्पण केले. सेम टाइम, नेक्सट यीअर या नाटकातील कामासाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला. मार्टिन स्कॉर्सेसच्या ॲलिस डजंट लिव्ह हिअर एनमोर (१९७४) मधील विधवा ॲलिस हयातच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. द लास्ट पिक्चर शो (१९७१), द एक्सॉर्सिस्ट (१९७३), सेम टाईम, नेक्स्ट यीअर (१९७८), रीसरेक्शन (१९८०), आणि रिक्वेम फॉर अ ड्रीम (२०००) मध्ये तिच्या इतर ऑस्कर-नामांकित भूमिका होत्या. हॅरी अँड टोंटो (१९७४), हाऊ टू मेक एन अमेरिकन क्विल्ट (१९९५), डब्ल्यू. (२००८), इंटरस्टेलर (२०१४), द एज ऑफ ॲडलाइन (१९९५) आणि पिसेस ऑफ अ वुमन (२०२०) या तिच्या इतर उल्लेखनीय चित्रपट भूमिकांचा समावेश आहे.

तिने एनबीसीवरील कायदेशीर नाटक लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट (२००९) मध्ये पाहुणी भूमिके केली ज्यासाठी तिने सहाय्यक भूमिकेसाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कार जिंकला. २०१३ मध्ये हा पुरस्कार तिने परत जिंकला मिनिसिरीज पॉलिटिकल ॲनिमल्स मधील तिच्या कामासाठी. तिच्या इतर एमी-नामांकित भूमिकांमध्ये पॅक ऑफ लाइज (१९८८), मिसेस हॅरिस (२००५), बिग लव्ह (२००८), फ्लॉवर्स इन द ॲटिक (२०१४), आणि हाउस ऑफ कार्ड्स (२०१६) यांचा समावेश आहे. २००० पासून, ती ॲक्टर्स स्टुडिओ, न्यू यॉर्क शहरातील ड्रामा स्कूलची सह-अध्यक्ष आहे. २०१३ मध्ये, तिला तिच्या नाटलातील कामासाठी अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →