एर्लिंग ब्रॅऊट हालांड (२१ जुलै, २०००:लीड्स, इंग्लंड - ) हा नॉर्वे साठी आणि मँचेस्टर सिटी या क्लबसाठी आक्रमक फळीतून फुटबॉल खेळतो.
हालांडचे वडील आल्फी हालांड हे व्यावसायिक फुटबॉलपटू होते. ते इंग्लंडमध्ये क्लब फुटबॉल खेळत असताना एर्लिंगचा जन्म तेथेच झाला. परंतु काही वर्षांनंतर त्याचे कुटुंब नॉर्वेमधील ब्रायन येथे परतले. त्याची आई ग्राय म्युरिट ब्युएन ही सुद्धा एक अॅथलीट होती. हालांडने ब्रायन एफसी या स्थानिक क्लबच्या अकादमीमध्ये फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने वरिष्ठ संघात पदार्पण केले.
ब्रायन क्लबनंतर त्याने नॉर्वेमधील मोल्डे एफके आणि त्यानंतर ऑस्ट्रियाच्या आरबी साल्झबर्ग क्लबमध्ये प्रवेश केला. त्याने साल्झबर्गसाठी खेळताना युएफा चॅम्पियन्स लीगमध्ये भाग घेतला. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये तो जर्मनीच्या बोरुशिया डार्टमुंड क्लबमध्ये सामील झाला. तेथे त्याने ८९ सामन्यांत ८६ गोल केले. २०२२ मध्ये त्याने मँचेस्टर सिटी क्लबमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच हंगामात क्लबला ट्रिबल (तीन प्रमुख स्पर्धांचे विजेतेपद) जिंकून देण्यात सहभाग नोंदवला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हालांड नॉर्वेच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या कामगिरीच्या जोरावर नॉर्वेचा संघ पात्रता फेरी पार करून २०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला. या विश्वचषक स्पर्धेत नॉर्वेच्या संघाने बाद फेरीत (उपउपांत्य किंवा राउंड ऑफ १६) ब्राझिल विरुद्ध २-१ असा विजय मिळवला, ज्यामध्ये हालांडने दोन गोल केले आणि संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. या स्पर्धेत त्याने एकूण ७ गोल केले आहेत.
एर्लिंग हालांड
या विषयातील रहस्ये उलगडा.