एरोलिनिआस आर्जेन्तिनास

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एरोलिनिआस आर्जेन्तिनास

एरोलिनिआस आर्जेन्तिनास (स्पॅनिश: Aerolíneas Argentinas) ही लॅटिन अमेरिकेतील आर्जेन्टिना देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४९ साली चार कंपन्यांचे एकत्रीकरण करून ही कंपनी स्थापन करण्यात आली. एरोलिनिआस आर्जेन्तिनासचे मुख्यालय बुएनोस आइरेस येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

१९९० साली दिवाळखोरीत निघाल्यानंतर एरोलिनिआस आर्जेन्तिनासचे खाजगीकरण करण्यात आले व तिला स्पेनच्या आयबेरियाने विकत घेतले. परंतु २००८ साली एरोलिनिआस आर्जेन्तिनासचे पुन्हा राष्ट्रीयीकरण घडले व सध्या ती आर्जेन्टिना सरकारच्या मालकीची आहे. २०१२ सालापासून एरोलिनिआस आर्जेन्तिनास स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →