एर ट्रॅन्सॅट फ्लाइट २३६

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एर ट्रॅन्सॅट फ्लाइट २३६ ही २४ ऑगस्ट २००१ रोजी कॅनडातील टोराँटो पासून पोर्तुगालची राजधानी लिस्बनला जाणारी एक आंतरखंडीय प्रवासी विमानसेवा होती. एरबस ए३३० प्रकारच्या आणि नोंदणी क्रमांक C-GITS असलेल्या या विमानात एकूण ३०६ प्रवासी आणि कर्मचारी होते. उड्डाणाच्या सुमारे चार तासांनंतर विमानाच्या उजव्या इंजिनातील इंधन वाहिनीत गळती सुरू झाली. परिणामी, विमानातील सर्व इंधन संपले आणि दोन्ही इंजिने बंद पडली. मुख्य वैमानिक रॉबर्ट पिशे आणि फर्स्ट ऑफिसर डर्क डेयागर यांनी विमानाचे एझोरेस येथील लाहेस विमानतळावर हे विमान उतरवले. यात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही.

दोन वर्ष जुन्या या विमानाला दोन रोल्स-रॉइस ट्रेंट ७७२ बी-६० इंजिने लावलेली होती. उड्डाणाच्या वेळी विमानात ४६.९ टन इंधन होते, जे नियमानुसार आवश्यकतेपेक्षा अधिक होते. इंधन गळतीमुळे इंधनटाक्यांमधील असमतोल वैमानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी डाव्या टाकीतून उजव्या टाकीत इंधन हलवणे सुरू केले परंतु गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा उपयोग झाला नाही आणि अखेरीस दोन्ही इंजिने बंद पडली.

विमान लाजेस विमानतळापासून सुमारे ६५ नॉटिकल मैल दूर असताना वैमानिकांनी इंजिने बंद पडल्याची माहिती दिली. त्यांनी अंधारात उपकरणे न वापरता फक्त दिसत असलेल्या दिव्यांच्या आधाराने विमान उतरवले व तातडीने विमानातून प्रवशांना बाहेर काढले. उतरताना १८ जण जखमी झाले. या घटनेनंतर विमानाला अझोरेस ग्लायडर असे टोपणनाव मिळाले. हे प्रवासी विमान इंजिनशिवाय सर्वात लांब तरंगत उतरणारे विमान होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →