एम. जयशंकर (१९७७ – २७ फेब्रुवारी २०१८), ज्याचे टोपणनाव सायको शंकर होते, हा एक भारतीय गुन्हेगार, लैंगिक शिकारी आणि सिरीयल किलर होता. हा २००८ ते २०११ दरम्यान बलात्कार आणि खूनांच्या मालिकेसाठी कुप्रसिद्ध होता. तो तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सुमारे ३० बलात्कार, खून आणि दरोड्याच्या प्रकरणांमध्ये सहभागी होता असे मानले जाते. त्याच्या मृत्यूच्या वेळी, त्याच्यावर किमान १९ महिलांची हत्या केल्याचा आरोप होता.
२००९ मध्ये अटक केल्यानंतर, जयशंकरला बंगळुरूमध्ये तुरुंगात टाकण्यात आले, जिथे त्यांना मानसिक आजार असल्याचे निदान झाले. त्याला २७ वर्षांचा तुरुंगवास झाला होता. मार्च २०११ मध्ये कोर्टातून जेलमध्ये नेताना तो पळाला. त्याने मे २०११ मध्ये कर्नाटकामध्ये परत ६ बलात्कार व खून केले व पकडल्या गेला. ३१ ऑगस्ट २०१३ रोजी त्याने आजारी असल्याचे नाटक केले व जेलच्या रुग्णालयात भरती झाला. तो रुग्णालयातून पळून गेला. पण लगेच ६ सप्टेंबरला पकडल्या गेला. त्यानंतर त्यांना उच्च सुरक्षा तुरुंगात ठेवण्यात आले. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी जयशंकर यांनी बंगळुरू मध्यवर्ती कारागृहातून पळून जाण्याचा पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर, २७ फेब्रुवारी रोजी त्यांनी ब्लेडने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली.
२०१७ मध्ये सायको शंकरा हा कन्नड चित्रपट आला जो त्याच्या हत्येच्या काळात त्याच्या बळींवर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर केंद्रित होता.
एम. जयशंकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?