ए.बी.ए.पी. (ॲडव्हान्स्ड बिझनेस ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग लॅंग्वेज) या भाषेची चौथी पिढी सध्या वापरात आहे. ही सॅपच्या नेटविवर व सॅप ऍप्लिकेशन सर्व्हर साठी वापरात आहे. ए.बी.ए.पी. भाषेची सुरुवात ऐंशीच्या दशकात जर्मनी येथे झाली. ही भाषा सोपी असून आज्ञावलीची भाषा सहजतेने वाचता येण्यासारखी असावी या भूमिकेतून या भाषेची बांधणी केली गेली. ही भाषा 'सी' या भाषेच्या साहाय्याने लिहिण्यात आली. याशिवाय जावा ही आज्ञावली लिहिण्याची भाषाही यासाठी पूरक भाषा म्हणून वापरात आहे. व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली सॅप ही ए.बी.ए.पी. या आज्ञावली लिहायच्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एबीएपी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.