एडवर्ड जॉन डेव्हिड "एडी" रेडमायने (६ जानेवारी १९८२) एक इंग्रजी अभिनेता आहे. एक अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, दोन ऑलिव्हिये पुरस्कार यासह त्याला विविध पुरस्कार मिळाले आहेत.
रेडमायनेने १९९६ मध्ये दूरचित्रवाणीवर पदार्पण करण्यापूर्वी वेस्ट एंड थिएटरमध्ये व्यावसायिक अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. लाइक माइंड्स (२००६), द गुड शेफर्ड (२००६) आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज (२००७) हे त्यांचे पहिले चित्रपट होते. रंगमंचावर, रेडमायनने २००९ ते २०१० पर्यंत रेड आणि २०११ ते २०१२ पर्यंत रिचर्ड दुरसा च्या निर्मितीमध्ये काम केले. रेड या नाटकासाठी त्याने नाटकातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्याचा टोनी पुरस्कार आणि सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार जिंकला.
द थिअरी ऑफ एव्ह्रीथींग (२०१४) मधील भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि द डॅनिश गर्ल (२०१५) मधील ट्रान्सजेंडर कलाकार लिली एल्बे यांच्या भूमिकेसाठी रेडमायनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी सलग नामांकन मिळाले व २०१४ मध्ये त्याने हा पुरस्कार जिंकला. २०१६ ते २०२२ पर्यंत, त्याने फॅन्टास्टिक बीस्ट चित्रपट मालिकेत न्यूट स्कॅमंडर म्हणून काम केले जी हॅरी पॉटर सोबत जोडलेली मालिका आहे.
एडी रेडमेन
या विषयावर तज्ञ बना.