हरावू वेंकटनरसिंघा वेरदा राज "एच. व्ही. आर." आयंगार ICS (२३ ऑगस्ट १९०२ - २२ फेब्रुवारी १९७८) हे १ मार्च १९५७ ते २८ फेब्रुवारी १९६२ पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहावे गव्हर्नर होते.
ते भारतीय नागरी सेवेचे सदस्य होते व २० ऑक्टोबर १९२६ रोजी सेवेत दाखल झाले. १९४१ च्या नवीन वर्षाच्या सन्मान सोहळ्यात त्यांना कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (CIE) म्हणून दिले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून काम केले.
आयंगारच्या कार्यकाळात, भारतीय नाणे प्रणाली पूर्वीच्या पाई, पैसा आणि आणे प्रणालीपासून आधुनिक दशांश नाणे प्रणालीकडे वळली. १९६२ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला. २००२ मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, एक सचित्र पुस्तक, स्नॅपशॉट्स ऑफ हिस्ट्री—थ्रू द रायटिंग्ज ऑफ एचव्हीआर आयंगार प्रकाशीत झाले. १९६२ मध्ये त्यांच्या निवृत्तीनंतर लिहिलेल्या लेखांचा समावेश ह्या पुस्तकार होता. त्यांची मुलगी इंदिरा आणि जावई बिपीन पटेल यांनी संकलित आणि संपादित केले होते.
एच.व्ही.आर. आयंगर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.