एच.ए.एल. तेजस (रोमन लिपी: HAL Tejas;) हे हलक्या वजनाच्या लढाऊ विमानवर्गातील अर्थात लाइट कॉंबॅट एरक्राफ (एल.सी.ए.) वर्गातील संपूर्ण भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. इ.स. १९८३ साली एल.सी.ए. हा कार्यक्रम भारतीय शासनातर्फे हाती घेण्यात आला. इ.स. १९७० च्या दशकापासून भारतीय वायु सेना रशियन बनावटीच्या मिग २१ व मिग २३ अवलंबून होती. इ.स. १९९० च्या दशकात या विमानांचा सुमारे २० वर्षांचा सेवाकाळ संपल्यावर वायुसेनेत मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच विदेशी बनावटीच्या विमानांवरील अवलंबन कमी व्हावे हासुद्धा विचार त्यामागे होता .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एच.ए.एल. तेजस
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.