एकविरा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एकविरा

महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे प्रमुख मानली जातात; त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी होय. एकवीरा देवी ही रेणुका मातेचा अंश आहे. तर रेणुका माता म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती देवी होय. वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. एकवीरा आई ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते. एकवीरा आईचे मुळरूप रेणुका माता आहे. आणि तिचे पूर्ण स्वरूप विरारच्या डोंगरावर असलेली जिवदानी देवी देवी आहे. जीवदानी देवीला महावीरा देवी असे म्हणतात. त्यामुळे एकवीरा मातेची मोठी बहिण जीवदानी देवी मानली जाते. तर बारोंडा देवी ही छोटी बहिण आणि इतर अवतार जोगेश्वरी देवी (योगेश्वरी देवी), यल्लमा, यमाई, तुळजाभवानी, येडेश्वरी ह्या बहिण मानल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →