एकतेचा पुतळा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एकतेचा पुतळा

स्टॅच्यू ऑफ युनिटी (मराठी: एकतेचा पुतळा) हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताततील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे. स्मारक २०,००० मी२ क्षेत्रात आहे आणि १२ किमी२ आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन अँड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८मध्ये पूर्ण झाले.

भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती. आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →