ऋषी कपूर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ऋषी कपूर

ऋषी कपूर ( ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रिल २०२०) हा एक भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक होता. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. इसवी सनाच्या १९९० च्या व २००० च्या दशकात नायकाच्या भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकांच्या स्वरूपात बदल केला. 'कुछ तो है. या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवून ठेवतो तर अग्निपथ(नवीन) मध्ये रौफ लाला हा भीतिदायक वाटतो. औरंगजेब सिनेमातील त्याची भूमिका निर्दयी वाटते.30 एप्रिल २०२०रोजी त्यांचे निधन झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →