उल्हास वासुदेव पाटील

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

उल्हास वासुदेव पाटील

डॉ. उल्हास वासुदेव पाटील (२३ फेब्रुवारी १९६०) हे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते व रावेर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आहे. काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्यांमध्ये डॉ.उल्हास पाटील यांचे नाव घेतले जाते. सध्या ते काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत. काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील नेत्यांमध्ये डॉ.उल्हास पाटील यांचे नाव घेतले जाते. सन १९९८ मध्ये काँग्रेसपक्षाने त्यांना लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी जळगाव जिल्हा हा भाजपचा गड झाला होता. अशा स्थितीतही त्यांना तब्बल ५६ हजार ५१४ मतानी ते विजयी झाले होते. मात्र त्यांना खासदारकीचा पाच वर्षांचा पूर्ण कालावधी मिळाला नाही. अवघे 13 महिन्यात सरकार कोसळले, लोकसभा बरखास्त झाली. पुन्हा झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अवघ्या तेरा महिन्यांचा विरोधी पक्षाचा कालावधी मिळाल्यानंतरही त्यांनी जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले, अर्थात ते खासगी आहे. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय, सहकारी बँक, विधी महाविद्यालय, फॅशन डिझायनिंग कॉलेज सुरू केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →