ज्ञानदेव यशवंतराव पाटील

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ज्ञानदेव यशवंतराव पाटील

डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डी.वाय. पाटील (२२ ऑक्टोबर, १९३५ - ४ ऑगस्ट, २०२६) हे एक भारतीय राजकारणी होते. त्यांनी बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. ते महाराष्ट्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. समाजकार्यासाठी त्यांना १९९१ मध्ये 'पद्मश्री पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले होते. २४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता.

पाटील हे १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून गेले.

डी. वाय. पाटील हे राजकारणी होते, तरी ते प्रामुख्याने त्यांनी स्थापन केलेल्या आणि स्वतःचे नाव असलेल्या शेकडो शाळा व महाविद्यालयांसाठी ओळखले जातात.

शैक्षणिक संस्था उभारण्यात अत्यंत सक्रिय सहभाग असल्यामुळे त्यांना 'शिक्षणसम्राट' हे बिरुद मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →