उल्लाडन ही एक भारतीय आदिवासी जमात आहे. केरळमधील क्विलॉन व कोट्टयम् जिल्हांतील डोंगराळ भागात हे लोक राहतात. लोकसंख्या सुमारे ३,५०० (सन १९६१ च्या जनगणनेप्रमाणे). उल्ल (अंतर्गत भाग) व नाडू (देश) ह्या दोन शब्दांपासून उल्लाडन हे नाव झाले असावे. उल्लाडन या संज्ञेच्या इतरही उपपत्ती दिल्या जातात. कट्टलन व नाडी (नामडी) ह्या नावांनीही हे लोक ओळखले जातात. जंगलात राहणाऱ्या उल्लाडनांना मालाउल्लाडन म्हणतात. नागरी भागात राहणाऱ्या उल्लाडनांना तेथील हिंदुलोक अस्पृश्य समजतात. मालाउल्लाडनांची लोकसंख्या सुमारे ३,००० (१९६१ च्या जनगणनेप्रमाणे) होती. उल्लाडन स्वतःला केरळचे मुळ रहिवासी समजतात. रूढ दंतकथेवरून ते वाल्मीकीचे वंशज असावेत, असे वाटते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उल्लाडन
या विषयावर तज्ञ बना.