उमरखेड तालुका

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

उमरखेड तालुका

उमरखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. उमरखेड तालुका यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. उमरखेड शहराच्या दक्षिणेस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका आहे. इथे उंबराची खूप झाडे असल्यामुळे या गावाचे नाव उंबरखेड आणि पुढे त्याचाच अपभ्रंश उमरखेड असा झाला आहे.

उमरखेड तालुक्यालगत पैनगंगा नदी आहे. पैनगंगा या नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा हे यवतमाळ जिल्ह्यातील आणि विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.



उमरखेड शहराचे पूर्वीचे नाव उंबरखेड़ (औदुंबरनगरी) असे होते. नांदेड हे शहर उमरखेडपासून सुमारे ७० कि.मी.वर आणि पुसद ४० कि.मी.वर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →